महू धरण,कुडाळी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा


 महू धरण,कुडाळी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा


कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी 



महू धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे. पुढील काही तासात धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. सांडव्यावरुन होणा-या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होऊ शकते,


कुडाळी नदीकाठावरील महू/टोपेवाडी/पिंपळी/खर्शी बारामुरे/ करहार / वालूथ। हुमगांव / आखाडे/बामणाेली/सांगवी/कुडाळ/ सर्जापूर/ कळंबे / उडतारे ता.जावली जि.सातारा सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की,नदीपात्रामध्ये प्रवेश करु नये.तसेच पुलावरुन पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये.

असे धरण व्यवस्थापन स्तरावरुन सर्वांना सूचित करण्यात येत आहे.(रा.पी.मिकम)उपविभागीय अधिकारी कृष्णानगर वसाहत उपविभाग, सातारा.

Post a Comment

0 Comments