आंबवडे मार्गे रायरेश्वर केंजळगड कडे जाणारा आंबवडे कोर्ले रस्त्याची दयनीय अवस्था.


 धनाजी पवार/ निवासी संपादक/पुणे प्रतिनिधि.


आंबवडे मार्गे रायरेश्वर केंजळगड कडे जाणारा आंबवडे कोर्ले रस्त्याची दयनीय अवस्था.


भोर : आंबवडे मार्गे रायरेश्वर केंजळगड कडे जाणारा आंबवडे कोर्ले रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यामुळे रस्त्यावर पाण्याची डबकी तयार झाली आहेत. रस्ता अरुंद असून साइडपट्टी खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.रस्त्याच्या दुतर्फा  झाडी झुडपे झाल्याने वळणा-पिळनावरील रस्ता झाडामुळे दिसेनासा झाला आहे. दिशादर्शक फलक झाडांच्या वेलीत गायब झाले आहेत, अशा अनेक अडथळ्यांचा सामना करीत वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, असे निवेदन  निवेदन दरवर्षी नागरिकां मार्फत  सार्वजनिक बांधकाम विभागास दिले जाते. रस्त्याचे दुरुस्तीकरण तात्काळ करा अन्यथा या भागातील नागरिकांना घेऊन मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही वेळोवेळी दिला जातो .

नाझरे, आंबवडे, म्हाकोशी वडतुंबी अशी गावे व शेवटी कार्ले , ओहळी तर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले केंजळगड, रायरेश्वर येथे पाऊस सुरू झाल्यानंतर पर्यटकांची होणारी गर्दी. तसेच या रस्त्यावरून शेकडो गाड्यांची  वाहतूक होत असून पर्यटकांना रस्त्यावरील खड्ड्यामध्ये चांगलीच कसरत करावी लागत आहे कर्णावड , रावडी , चिखलगाव, टिटेघर अशा अनेक

ठिकाणी रस्ता शिल्लक राहिला नाही. रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे असुन पावसाचे पाणी रस्त्यावर वाहून पाण्याची छोटी मोठी तळी साचल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रुस्ता दुरुस्ती करण्यासाठी केलेले प्रयत्न हे निष्फळ झाले आहेत. संबंधित विभागाने नियोजनपूर्वक चांगल्या उपाययोजना तालुक्यातील सर्वच रस्त्यांवरील खड्‌ड्यांबाबत राबवाव्यात. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments