जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा,शेतकर्यांची शासनाकडे मागणी


 जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा,शेतकर्यांची शासनाकडे मागणी


कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी 


जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी "शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचे "आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने करण्यात आले होते.


आ. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे,माथाडीचे नेते विठ्ठलराव गोळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .पंचायत समिती कार्यालय ते बाजार चौक ,वेण्णा चौक,तहसील कार्यालय अशा मार्गावर मोर्चा काढून जावळीचे तहसीलदार हनमंतराव कोळेकर यांना निवेदन देण्यात आले.


ओला दुष्काळ जाहीर करा !अन्यथा खुर्च्या खाली करा . !यासारख्या घोषणा यावेळी दिल्या जात होत्या तहसीलदार कार्यालयाच्या गेटवर विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे,माथाडीचे नेते विठ्ठलराव गोळे ,माजी सभापती मोहनराव शिंदे ,बाजार समितीचे संचालक बुवासाहेब पिसाळ ,राज्य महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष समिंद्रा जाधव ,नारायण शिंगटे, रूपाली भिसे ,यांनी आपल्या भाषणातून शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर  करावा अशी मागणी केली. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला.                    


या  प्रसंगी आनंदराज जुनघरे, गोपाळराव बेलोशे, रामदास पार्टे, राजश्री शिंदे ,सोमनाथ कदम ,रोहित रोकडे ,नारायण शिंगटे ,प्रकाश कदम ,विलास दुंदळे ,राम कदम, चंद्रकांत गवळी ,समीर डांगे, सुनील फरांदे ,राजेंद्र कदम, अमृतलाल शेडगे,नारायणदळवी ,तेजस्विनी केसकर ,शैलाजा कदम, यांच्यासह तालुक्यातील शेकडो पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोर्चासाठी उपस्थित होते.यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की छ. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्हयातील जावली तालुका हा अल्प भु-धारक शेतकऱ्यांचा तालुका आहे. जावली तालुक्यातील बहुसंख्य लोक माथाडी कामगार म्हणून मुंबई, टठाणे,नवीमुंबई,पुणे या परीसरात माथाडी स्वरूपाची कामे करतात.आणि आपल्या हक्काची शेती करून उदरनिर्वाह चालवितात.परंतू १६ मे २०२५ पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचे नंतर मोसमी पावसामध्ये रूपांतर झाले आणि आजअखेर पाउस सुरूच आहे.परिणामी जावली तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन,भुईमुग, घेवडा,ज्वारी इत्यादी पिकाची पेरणी करण्याची संधीच मिळालेली नाही.आणि ज्या २० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांची सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिकांची पुर्णपणे नासाडी झाली आहे.आजअखेर पाउस सुरूच असल्याने या वर्षीच्या हंगामी पिकांची पेरणी होवूच शकणार नाही.म्हणुनच आम्ही महाराष्ट्र राज्य शासनाकडे कळकळीची विनंती करीत आहोत की,आमच्या जावली तालुक्यास ओला दुष्काळ जाहीर करून आमच्या जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देवून, त्यांना मायेची मदत करून दिलासा द्यावा.


केंद्र शासनाने निश्चीत केलेल्या नैसर्गीक आपत्ती योजनामध्ये प्रामुख्याने चक्रीवादळ,ओला दुष्काळ,भुकंप,आग,पुर,गारपीट,दरड कोसळणे,ढगफुटी,थंडीची लाट,शेतीपिकाचे नुकसान किंवा इतर नुकसानीकरीता राज्य आपत्ती निवारण योजना निधीमधून पिडीतांना मदत करणे गरजेचे आहे.असा नियम असतानाही आजअखेर महाराष्ट्र राज्य सरकारी यंत्रणा किंवा इतर कोणत्याही यंत्रणेने याची दखल अद्याप घेतलेली नाही.महसुल मंडल अधीकाऱ्यांनी सतत पडणाऱ्या पावसाची दखल घेवून प्रत्येक गावामधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणे आत्यावश्क होते. जेणेकरून सरकार दरबारी जावली तालुकामध्ये  सतत पडणाऱ्या पावसाची नोंद घेवून 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यास मदत झाली असती. परंतू आजअखेर कोणतीही यंत्रणा शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर आलेली नाही.


        जावली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांतर्फे महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्रीमंडळास आणि लोकप्रतिनिधींना नम्र विनंती विनंती करण्यात येत आहे की, मागील दिड महीन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसाची नोंद घेवून केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या नैसगीक आपत्ती निवारण योजनेमधून जावली तालुक्यास 'ओला दुष्काळ' जाहीर करून सर्व शेतकरी बांधवांना सहकार्याचा हात द्यावा ही नम्र विनंती. दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


चौकट-शासनाने एक महिन्याच्या आत ओला दुष्काळ जाहीर न केल्यास  पुणे महार्गावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.


(विठ्ठलराव गोळे.)


चौकट-जावलीकरांचा आवाज पोचला विधिमंडळ अधिवेशनात

जावलीतील शेतकऱ्यांच्या मोर्चाचे  विधिमंडळ अधिवेशनात पडसाद.....

" ओला दुष्काळ जाहिर करा " या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.. तिकडे लगेच विधिमंडळ अधिवेशनात आ.शशिकांतजी शिंदे यांनी हा प्रश्न लावून धरून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.


याला उत्तर देताना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना .शंभुराजे देसाई यांनी चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments