ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची अहिरे खंडाळा येथे स्व.अविनाश धायगुडे पाटील यांच्या निवासस्थानी भेट


 ग्रामविकास मंत्री जयकुमार  गोरे यांची अहिरे खंडाळा येथे स्व.अविनाश धायगुडे पाटील यांच्या निवासस्थानी भेट 


  लोणंद प्रतिनिधी 


आज दि.12 जुलै रोजी खंडाळा तालुका दौऱ्यानिमित्त ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी  खंडाळा तालुक्याचे माजी सभापती स्व. अविनाश धायगुडे पाटील यांच्या अहिरे येथील निवासस्थानी भेट दिली .  यावेळी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांच्या समवेत खंडाळा तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक विषयांवरती चर्चा झाली‌. आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका व खेड जिल्हापरिषद गटातील विकास कामे या विषयावर चर्चा झाली . 


यावेळी खेड जिल्हा परिषद गटातील विविध गावातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते . 

 यावेळी बोलत असताना ऋषिकेश धायगुडे यांनी मतदारसंघातील विकास  कामांची मागणी लाऊन धरली . 


तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोमाने काम करा मी तुमच्या सोबत असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलत असताना केले . तसेच ऋषिकेश धायगुडे यांच्या गटाचे उपस्थित विविध गावच्या कार्यकर्त्यांचे  प्रश्न मार्गी लावले .


यावेळी खंडाळा तालुका पंचायत समितीच्या मा.उपसभापती वंदनाताई धायगुडे पाटील उपस्थित होत्या .

Post a Comment

0 Comments