जमीअत उलमा ए हिंद यांच्याकडून भुईंज येथे रक्तदान शिबीर संपन्न


 जमीअत उलमा ए हिंद यांच्याकडून भुईंज येथे रक्तदान शिबीर संपन्न


कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी 


जमीअत उलमा ए हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने भुईंज येथे मोहरम निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन अक्षय ब्लड सेंटर सातारा यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.


शिबिरात सर्व हिंदू,मुस्लिम रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी,भुईंज मुस्लिम समाज,गावातील सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य होते.हे रक्तदान शिबीर याच नियोजन दरवर्षी करण्यात येणार असल्याच देखील या कार्यकर्माच्या निमीत्ताने नियोजकांकडून सांगण्यात आले.


या रक्तदान शिबीरामध्ये मुस्लीम समाजा बरोबर गावातील हिंदू समाजाने देखील मोठ्या प्रमाणात भाग घेवून समाज एकोप्याच दर्शन घडवल.

Post a Comment

0 Comments