हिवताप, डेंग्यु, व चिकुनगुण्या आजाराच्या प्रतिबंधासाठी वाई शहरात जनजागरण मोहीम



 हिवताप, डेंग्यु, व चिकुनगुण्या आजाराच्या प्रतिबंधासाठी वाई शहरात जनजागरण मोहीम


अक्षय क्षीरसागर / वाई


किटकजन्य आजाराच्या प्रतिबंधाकरीता जिल्हा ‌आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.  संजय कुंभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील  वैदयकिय अधिक्षक डॉ० सचिन वाळूजकर यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार  वाई शहरामधील सर्व शाळा व कॉलेज येथे किटकजन्य आजार जनजागृती कार्यक्रम आयोजीत केले जात आहेत यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना किटक जन्य आजारांवर प्रतिबंध करावयाचे असतील तर डास निर्मिती रोखने  हीच महत्त्वाची उपाययोजना असलेबाबत अधोरेखीत केले जाते. या करीता डास हा स्वच्छ व स्थिर पाण्यामध्येच अंडी घालत असल्याने व हे सर्व पाणीसाठे नागरीकांच्या घरामध्ये व घराशेजारी परिसरामध्ये असतात या बाबत माहीती दिली जाते. उपाययोजना म्हणुन नागरीकांनी सर्व पाणीसाठे आठवड्यातुन एकदा घासून पुसुन स्वच्छ करून कडा बांधुन ठेवावेत, भंगार सामानाची योग्य विल्हेवाट लावावी, व व्हेन्ट पाईप ला जाळी बसवावी, डबके बुजवावीत,  गटारे वहाती करावीत असे आवाहन करणेत आले सदर पर्यवेक्षक श्री अजित जगताप आरोग्य सहायक श्री विठ्ठल पोळ आरोग्य सेवक श्री राजेंद्र कुंभार श्री सोमनाथ पांढरपोटे हे परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments