वाईच्या तहसीलदार यांच्या विरोधात खंबाटकी बोगद्यात बोंबा बोंब आंदोलन घटना स्थळी भेट देऊन लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न


 वाईच्या तहसीलदार यांच्या विरोधात खंबाटकी बोगद्यात बोंबा बोंब आंदोलन

*घटना स्थळी भेट देऊन लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न*


अक्षय क्षीरसागर / वाई प्रतिनिधी 


वाई तालुक्यातील कुसगाव या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने सुरू करण्यात आलेला ब्लॅक जेम्स स्टोन क्रेशर बंद करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला लॉंग मार्च रोखण्यासाठी व चर्चेतून मार्ग काढण्यासाठी वाई तालुक्याच्या तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. 

आंदोलनकर्त्यांसोबतपी झालेल्या चर्चेदरम्यान आंदोलनकर्त्यांकडून संबंधित क्रशर व त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली जोपर्यंत दगडखान व क्रशर परवाना रद्द करण्याचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही लॉन्ग मार्च थांबवणार नाही या स्वरूपाची माहिती आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार यांना दिली. 

यावर तहसीलदार यांनी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला व कलेक्टर साहेब घरगुती अडचणींमुळे सोमवार पर्यंत रजेवर असल्यामुळे आपण आंदोलन थांबवावे आपण सोमवारी कलेक्टर साहेबांसोबत चर्चा करून यावर मार्ग काढू व तोपर्यंत क्रशरच्या ठिकाणी सुरू असणाऱ्या सर्व प्रक्रिया थांबवते व हे सर्व तुम्हाला लिखित स्वरूपात देते अशी माहिती आंदोलन करताना दिली यावर आंदोलन करते यांनी आपण लेखी स्वरूपात कलेक्टर साहेबांची बैठक होईपर्यंत क्रेशर मधील ब्लास्टिंग उत्खनन व कृषी त्याचबरोबर वाहतूक थांबवण्याचे लेखी पत्र द्या आम्ही हे आंदोलन स्थगित करतो अशी माहिती दिली. 

तहसीलदार यांनी त्या अनुषंगाने पत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि थोड्या वेळात त्यांचे प्रतिनिधी संबंधित पत्र घेऊन आंदोलन स्थळी पोहोचले पत्र वाचल्यानंतर त्यामध्ये फक्त कलेक्टर साहेब यांच्यासोबत बैठक नियोजित केल्याबद्दलच माहिती देण्यात आली. क्रशर ठिकाणी सुरू असणाऱ्या सर्व प्रक्रिया थांबवणे संबंधी कोणतीही माहिती त्या पत्रामध्ये देण्यात आली नाही. ही माहिती आंदोलन करते यांना समजल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला व आंदोलन करते यांनी तहसीलदार यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू करत आपला लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने चालू ठेवला त्यामुळे याप्रकरणी वाईच्या तहसीलदार यांची संशयास्पद भूमिका यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळत चालले आहे. व आता तहसीलदार श्रीमती सोनाली मिटकरी यांच्या निलंबनाची मागणी आंदोलन करते करत आहे.

एका बाजूने आंदोलन करते यांना क्रशरच्या ठिकाणी सर्व प्रक्रिया थांबवण्याच्या नावाखाली मूर्ख बनवण्याचे काम प्रशासन व तहसीलदार करत आहे दुसऱ्या बाजूला मात्र क्रशरच्या ठिकाणी राजरोसपणे उत्खनन सुरू आहे.

Post a Comment

0 Comments