सिडनी पॉईंटवरील सोलर युनिट कोसळलं — लाखो खर्च, दर्जा मात्र शून्य!
पांचगणी | प्रतिनिधी
पांचगणी नगरपरिषदेने पर्यटनस्थळ सिडनी पॉईंट येथे लाखो रुपयांचा खर्च करून सोलर युनिट उभारले. पण वाऱ्याच्या झोताने ते युनिट कोसळले! यामागे कोणतीही नैसर्गिक आपत्ती नाही, तर फक्त आणि फक्त ढिसाळ नियोजन, कमी दर्जाचे साहित्य आणि निष्काळजी प्रशासन जबाबदार आहे.
युनिटमध्ये आवश्यक ‘वजन’ कमी असल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. इतक्या मोठ्या खर्चाच्या कामात असा मूलभूत दोष असणे हे आश्चर्यकारकच नव्हे, तर धक्कादायक आहे.
दर्जाहीन कामांचा ढिगारा आणि नागरिकांचा विस्फोट!
सोलर युनिट प्रकरण ही केवळ सुरुवात आहे. संपूर्ण पांचगणीत अशा अनेक कामांची उदाहरणं आहेत ज्यात कोट्यवधी रुपये खर्च दाखवून गुणवत्तेचा बोजवारा उडवण्यात आला आहे. रस्ते असोत, लाईटिंग, गटारी, उद्याने... सर्वत्र "काम" नावाखाली "खर्च" आणि "अपयश" यांचा साखळदंड दिसून येतो.
हा पैसा आमचा आहे!" — दीपक प्रभु कांबळे यांचा रोष
पांचगणीतील जागरूक नागरिक दीपक प्रभु कांबळे यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती समाजमाध्यमांद्वारे आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे समोर आणली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की —
आता नागरिकांचे मत स्पष्ट आहे — काम सुरु होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष फोटोज, संपूर्ण खर्चाचा हिशोब, संबंधित कंत्राटदारांची माहिती, याचा तपशील सार्वजनिक व्हावा.
पांचगणीला पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन कधी मिळणार?"
हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून बसला आहे. अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावेच लागेल.
*दीपक प्रभू कांबळे*
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!