राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन व माणिकराव डावरे प्रो. प्रोफाइव इंजिनिरिंग यांच्या कडून शाळेस स्मार्ट टीव्ही भेट
धनाजी पवार / निवासी संपादक
राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून व मा. माणिकराव डावरे सर प्रो. प्रोफाइव इंजिनिरिंग यांच्या माध्यमातून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव, तालुका भोर, जिल्हा पुणे .येथे आज स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला , या टीव्हीच्या मार्फत डिजिटल शिक्षण प्रणाली मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे असे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व यांच्या वतीने बद्दल सांगण्यात आल.विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झालं होतं, राजश्री शाहू महाराज सोशल फाउंडेशन चे मा.गणेश चऱ्हाटे यांच्याकडून आभार मानण्यात आले .तसेच इ.१ ली च्या विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेऊन एक अभिनव उपक्रम घेण्यात आला व गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना शिंदे परिवार यांच्या वतीने वह्या , शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .तसेच ग्रामस्थ , शाळा व्यवस्थापन समिती कार्यक्रमा वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव मा .रमेश धर्माजी शेटे (मुख्याध्यापक), स्वाती महांगरे ,श्रीधर गव्हाणे सदिच्छा शिर्के शिक्षक वृंद ,तसेच सौ .भाग्यश्री गणेश चऱ्हाटे, (सरपंच नांदगाव), रावसाहेब चऱ्हाटे, (मा. उपसरपंच), ईश्वर चऱ्हाटे, स्वप्नाली संदीप बर्डे ,(शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,) अरुण चऱ्हाटे, (शाळा व्यवस्थापन समिती तज्ञ मार्गदर्शक), निलेश विठ्ठल कुडले (मा. सरपंच), पांडुरंग सावंत (आपटी विकास सोसायटी सदस्य), विजय चऱ्हाटे, बापू कुडले (प्रहार ता अध्यक्ष, )मिलिंद भातुसे, दिनकर चऱ्हाटे ,सोनम चऱ्हाटे, राजू मारणे, शिवाजी खोपडे, किरण कुडले ,गणेश चऱ्हाटे , पंढरीनाथ चऱ्हाटे,रघुनाथ मांढरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते ..
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!