वाईमध्ये तब्बल ५१ किलो गुटखा जप्त करुन पोलिसांनी केली एकास अटक


 वाईमध्ये तब्बल ५१ किलो गुटखा जप्त करुन पोलिसांनी केली एकास अटक 


आशिष चव्हाण / वाई प्रतिनिधी 


वाईमधील धोम कॉलनी येथे एक इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची विक्री करत असलेबाबत माहिती प्राप्त झाली त्यानुसार अन्नऔषध प्रशासनाचे अधिकारी अंमलदार यांचेसह सदरचे ठिकाणी छापा मारला असता, सदर ठिकाणी एक इसम हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटख्याची विक्री करीत असतांना मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे स्वप्नील मनोहर गायकवाड रा धोम कॉलनी असे असल्याचे सांगितले सदर ठिकाणाची झडती घेतली असता, तेथे सुमारे १०९४५४/- रुपये किंमतीचा ५१ किलो गुटख्याचा साठा मिळुन आल्याने सदरचा गुटख्याचा साठा अन्नऔषध प्रशासनाचे अधिकारी यांनी जप्त करुन सदरबाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वंदना रुपनवर यांनी स्वप्निल मनोहर गायकवाड याचेविरुध्द वाई पोलीस ठाणे गु.र.नं १७९/२०२५ भा.न्या. सं २२३ वैगरे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज हे करीत आहेत. सदरची कारवाई वाई पोलीस यांनी केली.

Post a Comment

0 Comments