वाई ! अपहरण झालेल्या इसमाचा अवघ्या ४ तासात शोध, ०५ आरोपींना डीबी ने केले जेरबंद


 वाई ! अपहरण झालेल्या इसमाचा अवघ्या ४ तासात शोध,  ०५ आरोपींना डीबी ने केले जेरबंद


अक्षय क्षीरसागर / वाई प्रतिनिधी 


दिनांक १०/०६/२०२५ रोजी रात्री १०.४५ वा चे सुमारास पसरणी ता. वाई जि. सातारा येथे सनी रमेश भोसले या इसमांस ७ ते ८ इसमांनी बेदम मारहाण करुन त्यास त्यांचेकडील गाडीत घालुन अपहरण केलेबाबत वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना माहिती मिळाल्यानंतर सदरबाबत लागलीच वाई पोलीस ठाणे येथे वाई पोलीस ठाणे गु.र.नं १७८/२०२५ भा.न्या. सं कलम १४० (४) वैगेर प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येऊन लागलीच वाई गुन्हेप्रकटीकरण विभागास सदरच्या अपहरण झालेल्या इसमाचा शोध घेऊन अपहरण करणारे आरोपींना ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्या त्यानुसार सदरचे अपहरण करणारे इसम हे कोल्हापुर जिल्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यानुसार कोल्हापुर पोलीस कक्षास तात्काळ वायरलेस द्वारे सदरचे घडले गुन्ह्याबाबत कळवुन वाई तपासपथक आरोपी शोध साठी कोल्हापुर येथे रवाना करण्यात आले. व आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेतला असता सदरचे आरोपी हे लक्ष्मीपुरी भागातील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिक पोलीसांचे सहायाने त्यांचा शोध घेऊन अपहरण झालेल्या इसमासह  १) गणेश विश्वास काटकर २) प्रशांत प्रकाश सुर्वे  ३) शुभम सुनिल जाधव ४) मानसिंग विजयसिंह भोसले ५) अभिजीत ऊर्फ पंप्या सर्जेराव तवंदकर सर्व रा उत्तरेश्वर मंदीर महादेव कोल्हापुर यांस ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी तपासपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, म. पो. हवा प्रियांका कदम, पो. कॉ श्रावण राठोड, म. पो. कॉ पुजा गोळे, पो. कॉ राम कोळी, पो. कॉ हेमंत शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments