धनाजी पवार / निवासी संपादक / पुणे प्रतिनिधी.
महाड मार्गावरील खोदकाम पावसाळ्यात त्वरित थांबवा
भोर- महाड मार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी रस्ता जागोजागी खोदला जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असतानाही सुस्थितीत असलेला रस्ता खोदला जात असल्याने धोकादायक होत आहे. त्यामुळे पावसाच्या तोंडावर नव्याने सुरू असलेले खोदकाम तत्काळ थांबवावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिला आहे.
याबाबत मंगळवारी (ता.१०)
भोर उपविभाग अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांना निवेदन दिले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले, संपर्क प्रमुख भानुदास दुधाणे, उपाध्यक्ष महेंद्र सोनवणे, सचिव शांताराम खाटपे, कार्याध्यक्षा राणी शिंदे उपस्थित होते. भोर महाड मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे कामे संत गतीने सुरूअसून, पूर्वीची कामे अपूर्ण असताना नव्याने चांगल्या रस्त्यावर खोदकाम केले जात आहे. खोदकाम केलेल्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊन अपघात होत आहेत.पावसाळ्यात अशी ठिकाणे अजून धोकादायक होणार असल्याने पूर्वी सुरू असलेली कामे पावसाळ्याच्या कालावधीत स्थगित करावीत. तसेच मंजूर असलेल्या ठिकाणची खोदकामे सुरू करू नये.अपूर्ण असलेल्या व खोदकाम केलेल्या ठिकाणी प्रवाशांना दिसतील असे सूचनाफलक व दिशादर्शक फलक लावावेत. तसेच दुतर्फा रस्त्याचे काम न करता एकाच बाजूने काम करावे. जर हलगर्जी पणामुळे अपघात अथवा दुर्घटना झाल्यास संबंधित शासन नियुक्त ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!