महाबळेश्वर नगर परिषद प्राथमिक शाळामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघ महाबळेश्वरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..‌...


 महाबळेश्वर नगर परिषद प्राथमिक शाळामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघ महाबळेश्वरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..‌...


प्रतिनिधी पांचगणी  नौशाद सय्यद


महाबळेश्वर येथील गिरिस्थान नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. १, २ मध्ये महाराष्ट्र पत्रकार संघ महाबळेश्वरच्या वतीने १ली ते ५ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी नगरपालिकेचे आबा ढोबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फकीर भाई वलगे, माजी सभापती अँड संजय जंगम, शिवनाट्य प्रतिष्ठानचे किसनराव खामकर, दि अर्बन बँक संचालक सतीश ओंबळे, महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका अध्यक्ष राहुल शेलार, उपाध्यक्ष रियाज मुजावर व पत्रकार संघाचे पदाधिकारी, शाळा क्र.१ चे नूतन मुख्याध्यापक यशवंत गोळे शाळा क्र. २ मुख्याध्यापक जनार्दन कदम, लक्ष्मण महाडिक सर, अर्जुन बनसोडे सर,अंजुम कुरेशी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रईसा शेख  मॅडम व आभार प्रदर्शन दत्तात्रय पाडळे सर यांनी केले. यावेळी फकीर भाई वलगे व राहुल शेलार, यशवंत गोळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

         कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार बुके देऊन करण्यात आला. १ली ते ५ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून गुणगौरव करण्यात आला. तसेच शाळा क्र. १ चे यशवंत गोळे सर यांची मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राहुल शेलार व रियाज मुजावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष फकीर भाई वलगे व मुख्य लिपीक आबा ढोबळे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोळे सरांचा सन्मान करण्यात आला.        


         विद्यार्थ्यांचा गुणगौरव केल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान पालकाच्या वतीने श्री ढाणक यांनी केला. या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments