केळघर घाटातील मारहाण प्रकरणी मेढा पोलीसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या


 केळघर घाटातील मारहाण प्रकरणी मेढा पोलीसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या


कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी 


मेढा;वाटंबे गावचे हद्दीत केळघर घाटात वळणावर या लाईनला चिकण माल टाकू नको म्हणून या कारणाने सिकंदर इस्माईल मोमीन वय 41 वर्ष रा. सातारा यास शिवीगाळ दमदाटी करून कोयता व दांडक्याने मारहाण करणाऱ्या आरोपींना मेढा पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. 

          

सातारा महाबळेश्वर केळघर घाटामध्ये वळणावर वाटंबे गावचे हद्दीत सिकंदर इस्माईल मोमीन रा. चाफळ तालुका पाटण, सध्या रा. 109 रामलीला अपार्टमेंट बुधवार पेठ सातारा व त्याचा भाऊ मुसा यांची व विनोद तुपे रा. वडोली भिकेश्वर ता. कराड यासह इतर तीन साथीदारांनी तु या लाईनला चिकण माल द्यायचा नाही असे म्हणून दमदारी करीत कोयता व दांडग्याने मारहाण केली असल्या बाबतचा गुन्हा मेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. 


सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद रामचंद्र तुपे रा. वडोली भिकेश्वर ता. कराड, जि. सातारा वाचा शोध घेत असताना तो त्याचा मित्र प्रफुल्ल मोहन पटेल रा.वाघेरी ता. कराड याचे डोंगराचे कडेला असलेल्या शेतामधील पत्र्याचे शेडमध्ये लपुन बसलेला असलेबाबत खात्रीशीर गोपनिय माहीती मिळाल्याने तात्काळ पोलीस ठाणेकडील खास पथक तयार करून त्यास पोलीस पथकाचे मार्फत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याचा साथीदार गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक हा सुद्धा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद तुपे वास गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्ह्यामध्ये अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता दि.१७ जून पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले असल्याचे पोलीसांनी सांगितले. तसेच गुन्ह्यातील मुख्य आरोपीस सहकार्य करणारा आरोपी प्रफुल्ल मोहन पटेल यास नोटीस दिलेली असून विधीसंघर्ष बालक यास बाल न्याय मंडळ यांचे समक्ष हजर केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि श्रीमती आश्विनी पाटील मेढा पोलीस स्टेशन ह्या करीत आहेत.

Post a Comment

0 Comments