नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र उद्योजक श्री. सुशांत भिलारे


 *नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र*

*उद्योजक श्री. सुशांत भिलारे*


कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी 


विध्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष अटळ आहे आणि सातत्य पूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र आहे असे मत मा. श्री सुशांत भिलारे यांनी व्यक्त केले. ते आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "आजच्या युवकासमोरील आव्हाने आणि विविध संधी" या विषयावर विध्यर्थ्यांच्यासाठी आयोजित व्याख्यान आणि मार्गदर्शन या कार्यक्रमात बोलत होते.


सदर कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या जीवन प्रवास विध्यार्थीच्या समोर मांडला.

जावली सारख्या ग्रामीण भागातील युवक सुद्धा कसा यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून पटवून दिले.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्ध, चिकाटी आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे असे मत त्यानी व्यक्त केले.


या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा डॉ प्रमोद घाटगे यांनी सुशांत भिलारे यांचा आदर्श युवकांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच शिक्षणामुळे भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतील असे मत मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविदयालयचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी यांनी शिस्त, संयम, सातत्यपूर्ण प्रामाणिक संघर्ष आणि एकनिष्ठा किती महत्वाची आहे हे पटवून दिले. तसेच जावली तालुक्यातील उद्योजक यांनी तालुक्यातील विध्यार्थीना प्रेरणा देऊन त्यांचे उज्वल भविष्य यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. श्री शंकर देशमुख सर यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रकाश जवळ यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा डॉ सारंगपाणी शिंदे यांनी केले आणि आभार प्रा डॉ संजय धोंडे यांनी मानले.

 सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील  विविध अभ्यास क्रमाचे विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments