२० लाख रुपये लुटणा-या केरळ राज्यातील दरोडेखारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या ; ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त


 २० लाख रुपये लुटणा-या केरळ राज्यातील दरोडेखारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या ; ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त


आशिष चव्हाण / वाई प्रतिनिधी 


दिनांक १२/०७/२०२५ रोजी पहाटे ०२.४५ ते ०३.४५ वा. चे दरम्यान पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ४८ वर अज्ञात व्यक्तीला इसमांनी इनोव्हा, स्कॉर्पीओ, स्विफ्ट कारचा वापर करुन फिर्यादी यांची हुंडाई व्हेन्यु कार क्रमांक एम.एच.०१ ई आर ९४६८ या गाडीस अडवून त्या गाडीच्या काचा लोखंडी रॉडने फोडुन, गाडीची तोडफोड करुन हुंडाई व्हेन्यू कार चालकास मारहाण करुन, त्यास चाकूचा धाक दाखवून कारमधील २०,००,०००/- रुपये रोख रक्कम चोरुन गाडीसह चालकाचे अपहरण केले होते तसेच गाडी व गाडीतील चालक (तक्रारदार) यास नंतर सर्जापुर फाटा ता.

जावली येथे सोडून पळुन गेले होते वगैरे मजकुरची तक्रार श्री. विशाल पोपट हासबे, वय - ३० वर्षे, रा. हिवरे ता. खानापुर

जि. सांगली यांनी दिलेने भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं. २२०/२०२५ भा.न्या.सं.क. १२६ (२), ३११, १४० (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हयाचे घटनास्थळी श्री. तुषार दोशी भा.पो.से., पोलीस अधीक्षक सातारा,

श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस

अधिकारी वाई यांनी भेट देऊन नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या

सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर व भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक

रमेश गर्जे यांना दिल्या होत्या, त्याअनुशंगाने स्था.गु.शा.कडील स.पो.नि. रोहित फार्णे व भुईंज पोलीस ठाणेकडील

पो.उ.नि. पतंग पाटील यांचे अधिपत्याखाली तपास पथके तयार केली तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयात

नाकाबंदी नेमण्याबाबत श्री. तुषार दोशी भा.पो.से. पोलीस अधीक्षक सातारा यांनी संबंधीत जिल्हयाच्या नियंत्रण कक्षास

कळविल्याने नमुद जिल्हयांत नाकाबंदी नेमण्यात आली होती.

गुन्हा केलेली इनोव्हा, स्कॉर्पीओ, स्विफ्ट ही वाहने सांगली जिल्हयात विटा, तासगाव बाजुस पळुन गेल्याची माहिती मिळाल्याने सदरची माहिती सांगली पोलीसांना कळविली असता सांगली पोलीसांनी सदरचे वाहन स्थानिक नागरीकांच्या मदतीने योगेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली येथे अडवुन गुन्हयातील मुख्य आरोपी विनीथ उर्फ राजन तद्नंतर तपास पथक अन्य आरोपींचा शोधघेण्याकरीता केरळ राज्याकडे रवाना झाले. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषन व पारंपारीक कौशल्यपुर्ण तपास तंत्राचा वापर करुन गुन्हयातील इतर आरोपी व गुन्हयात वापरलेल्या वाहनाबाबत माहिती प्राप्त केली. त्यानंतर केरळ पोलीसांच्या मदतीने गुन्हा करुन पळुन जाणारे केरळ राज्यातील इतर ६ आरोपी व गुन्हयात वापरलेली स्कॉर्पीओ क्रमांक के. एल. १० ए. जी. ७२०० हीस वायनाड, राज्य- केरळ येथून ताब्यात घेतले. त्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याकडील स.पो.नि.बिराजदार, पो.उ.नि. सतिश आंदेलवार व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने केरळ येथे जावून गुन्हयात वापरलेली इनोव्हा कार क्रमांक के. एल. ६४ एम २७९७ ही ताब्यात घेतली. मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. श्री. रमेश गर्जे हे करीत असुन त्यांनी गुन्हयाचे तपासा दरम्यान गुन्हयातील मुख्य आरोपी विनीथ उर्फ राजन राधाकृष्ण याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेली

२०,००,०००/- रुपये रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली हत्यारे जप्त केली असुन गुन्हयाचे तपासात एकुण ३५ लाख २७ हजार ५९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जबरीचोरी, चोरी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर

तुषार दाशा, भा.पा.से., पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्ष सातारा व बाळासाहेब भालचिम, उप-विभागीय पोलीस अधिकारी वाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स.पो.नि. रमेश गर्जे, स.पो.नि. सुधीर पाटील, स.पो.नि. रोहित फार्णे, स.पो.नि.

सखाराम बिराजदार, पो.उ.नि. पतंग पाटील, पो.उ.नि. सुरज शिंदे, पो.उ.नि. सतिश आंदेलवार, स्थानिक गुन्हे

शाखेकडील पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण

फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, अविनाश चव्हाण, अरुण पाटील, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, संकेत निकम, प्रविण पवार भुईंज पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार वैभव टकले, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, अमोल सपकाळ, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते, कराड शहर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार बामणे, प्रफुल्ल

गाडे यांनी सहभाग घेतला आहे.



अटक आरोपींची नावे -

१) विनीथ ऊर्फ राजन राधाकृष्ण वय ३० वर्षे, रा. ओलिओपारा, नालेपल्ली, जि. पलक्कड, राज्य-केरळ.

२) नंदकुमार नारायणस्वामी, वय ३२ वर्षे, रा. चिथीरा हाऊस, जयराम कॉलनी, चिराक्कड, पोस्ट-कुम्मातुरमेदु,

जिल्हा-पलक्कड, राज्य- केरळ,

३) अजिथ कुमार, वय २७ वर्षे, रा. कांजिकुलम हाऊस, मराथुरोड, कनिकुलम, पोस्ट- काल्लेपुल्ली जिल्हा - पलक्कड,

राज्य- केरळ

४) सुरेश केसावन वय ४७ वर्षे, रा. पलनाम, कुरीस्सी, पोलपुल्ली, पंचायत, पोस्ट-वेरकोल्ली, जि. पलक्कड,

५) विष्णु क्रिशनंकुट्टी, वय २९ वर्षे, रा. उषानिवास, सुर्यनकॉलनी, कारेक्कटूपरांम्बु, पोस्ट-अंबिकापुरम, जि.पलक्कड,

६) जिनु राघवन, वय ३१ वर्षे, रा. कांजिरक्कडवु, पोस्ट- मलांबुझा, जि . पलक्कड

७)कलाधरण श्रीधरण, वय ३३ वर्षे, रा. चिनीकुलांबू, पोस्ट-वावुल्यापूरम, अलथूर थोनिप्पाडम जि . पलक्कड

वरील प्रमाणे एकुण ०७ आरोपी अटक करण्यात आले असुन ईतर ०६ आरोपी फरार आहेत.

Post a Comment

0 Comments