जावळीत ६३ गावांमध्ये महिला राज,महत्त्वाच्या ग्रामपंचायती खुल्या तर काही आरक्षित.
कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी
जावळी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. ही सोडत जावळीचे प्रांताधिकारी विकास व्यवहारे, तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.एकूण १२५ ग्रामपंचायतींपैकी ६३ ठिकाणी महिला आरक्षण पडले असून, सर्वसाधारण प्रवर्गातूनही महिला सरपंच बनू शकत असल्याने जावळीत सरपंचपदासाठी महिलाराज दिसणार आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये हातगेघर,हुमगाव,कुडाळ ग्रामपंचायत,चोरांबे,आंबेघर त. मेढा,सोनगाव ग्रामपंचायत या ठिकाणी येथील नेत्यांना लक्ष घालावे लागणार आहे.
सायगाव, केळघर, गांजे, विभवी, करंजे, निझरे, जवळवाडी या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायती आरक्षित झाल्याने या ठिकाणच्या मातब्बरांचे मनसुबे हवेत विरले आहेत.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी कुसुंबी, कसबे बामणोली, म्हाते बुद्रुक अंधारी या महत्त्वाच्या ग्रामपंचायती आरक्षित झाल्याने या ठिकाणी नेत्यांना आपल्या सौभाग्यवती किंवा आपल्या विचारांच्या महिलांना संधी द्यावी लागणार आहे.
यामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी करंजे, वरोशी, दरे बु., आखाडे, पिंपळी. अनुसूचित जाती खुला प्रवर्गासाठी रांजणी, दुंद, सावली, भणंग. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी सायगाव, अनुसूचित जमाती खुला प्रवर्गासाठी केळघर. नागरिकांचा मागास महिला प्रवर्गामध्ये मह, सनपाने, आलेवाडी, आगलावेवाडी, काळोशी, गांजे, भामघर, म्हाते खुर्द, आर्डे, पवारवाडी, बिभवी, करंदी तर्फ मेढा, निझरे, केळघर तर्फ सोळशी, कोळघर, बाहुले, बेलावडे या गावांचा समावेश आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी
काटवली, घोटेघर, वालूथ, जरेवाडी, पानस पुनर्वसन, बामणोली तर्फ कुडाळ, महिगाव, कारगाव, गवडी, मुकवली, आसनी, मार्ली, खर्शी तर्फ कुडाळ, जवळवाडी, तळोशी,कुरळोशी, गोदेमाळ ही गावे आरक्षित झाली आहेत.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी शिंदेवाडी, दापवडी, विवर, भोगवली तर्फ कुडाळ, कावडी, रामवाडी, कोलेवाडी, भालेघर, रानगेघर, करंदोशी, भिवडी, रायगाव, महामुलकरवाडी, मोरघर, नरफदेव, मोरावळे, ओझरे, एकीव, कुसुंबी, कसबे बामणोली, उंबरेवाडी, आपटी, दिवदेव, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी, म्हाते बुद्रुक, मोहाट, वाकी, गाढवली पुनर्वसन, बेलोशी, मरडमुरे, वेळे, निपाणी, म्हसवे, कुंभारगणी, वहागाव, सरताळे, केसकरवाडी, अंधारी या गावांचा समावेश आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुईघर, खर्शी बारामुरे, आखेगणी, पानस, करहर, आंबेघर तर्फ कुडाळ, हातगेघर, हुमगाव, सोमडर्डी, शेते, करंदी तर्फ कुडाळ, धोंडेवाडी, कुडाळ, सर्जापूर, सोनगाव, आनेवाडी, दुदुस्करवाडी, दरे खुर्द, केंजळ, रिटकवली, धनकवडी, मालचौंडी, सांगवी तर्फ मेढा, पिंपरी तर्फ मेढा, तेटली, शेंबडी, मुनावळे, चोरांबे, मामुडीं, आंबेघर तर्फ मेढा, डांगरेघर, भूतेघर, बोंडारवाडी, रेंगडेवाडी, नांदगणे, ओखवडी, भोगवली तर्फ मेढा, वागदरे, गाळदेव, इंदवली तर्फ कुडाळ या गावात आरक्षण जाहीर झाले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!