'किसन वीर' कडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याचा टँकर


 *'किसन वीर' कडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याचा टँकर*


आशिष चव्हाण / वाई प्रतिनिधी 


भुईंज, दि.१/७/ २०२५ : संतश्रेष्ठ  श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची

पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतुने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन-

वीर साखर कारखान्याचे चेअरमन वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक नामदार

मकरंद (आबा) पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या

वाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर

साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करून तो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आला.


यावेळी प्रमोद शिंदे म्हणाले की, आळंदीहुन निघालेल्या या वारीमध्ये सर्व स्तरातुन

वारकरी सहभागी होत असतात. पंढरीच्या वारीमध्ये फक्त हरिनामाचा गजर व पुर्ण भक्तीभावाने वारकरी तल्लीन होत असतात. विठुरायाच्या दर्शनासाठी अतुर झालेले असंख्य वारकरी कित्येक

किलोमीटरचा प्रवास पायी करून पंढरपुरी दशेनासाठी जात असतात. या वारकऱ्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवु नये, याकरिता नामदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखाना व्यवस्थापनाने वारकऱ्याच्या

सेवेकरिता मागील तीन वर्षापासूनू कारखान्यामार्फत पाण्याचा टँकर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता


कार्यक्रमास कारखान्याचे संचालक रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, अजय भोसले, दिपक जाधवराव, जांब सोसायटीचे चेअरमन विकास शिंदे, सचिन निकम, गोविंद शिंदे, शामराव शिंदे, चीफ अकौटंट आर. जी. उन्हाळे, सुरक्षा अधिकारी पवन बाबर,

यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते

Post a Comment

0 Comments