मंदिरात चोरी करणाऱ्या चोरास वाई पोलिसांनी केली अटक


 मंदिरात चोरी करणाऱ्या चोरास वाई पोलिसांनी केली अटक


*प्रतिनिधी :- अक्षय शिरसागर (वाई)*


धोम ता. वाई जि. सातारा येथील सुप्रसिध्द श्री नवनाथ दत्त मंदीरात चोरी करणा-या इसमास वाई गुन्हेप्रकटीकरण विभागाने घेतले ताब्यात


दिनांक १६/०६/२०२५ रोजी वाई तालुक्यातील प्रसिध्द श्री क्षेत्र नवनाथ दत्त मंदीरातील दानपेटी फोडुन त्यामधील अंदाजे रोख रक्कम रुपये ६०००/-चोरी झालेबाबत निरंजन रमेश पवार यांनी वाई पोलीस ठाणेस फिर्यादी दिली होती. चोरीची फिर्यादी दाखल झालेनंतर वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांनी सदर चोरी ही मंदीरातील गंभीर स्वरुपाची चोरी असुन त्यातील आरोपीस ताब्यात घेऊन गेलेला मुद्देमाल जप्त करण्याच्या सुचना वाई पोलीस गुन्हेप्रकटीकरण विभागास दिल्या गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी अंमलदार यांनी श्री नवनाथ दत्त मंदीर व धोम गावाकडे जाणारे सीसीटीव्हीची पाहणी केली. सीसीटीव्ही मध्ये चोरीची घटना कैद झाल्याने त्यातील इसमाचा कसुन शोध घेतला असता, सदरचा इसम हा भोर तालुक्यातील टिटेघर गावातील सचिन आनंदा नवघणे हा असल्याचे निष्पन्न झाला. त्यास गुन्ह्याचे तपासकामी अटक करुन त्यास मा. न्यायालयाने ०१ दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली त्याच्याकडे अधिकचा तपास केला असता, त्याने धोम येथील श्री नवनाथ दत्त मंदीरातील चोरी केलेली रोख रक्कम रुपये ६०००/- ही आरोपीकडुन जप्त करण्यात आलेली आहे.


सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. तुषार दोषी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम, मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र शहाणे, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.हवा अजित जाधव, पो.कॉ श्रावण राठोड, पो. कॉ हेमंत शिंदे. पो. कॉ नितीन कदम, पो. कॉ विशाल शिंदे, पो.कॉ राम कोळी, पो.कॉ अजित टिके यांच्या पथकाने केलेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज हे करीत आहेत. मा. पोलीस अधिक्षक साो श्री तुषार दोषी, अप्पर पोलीस अधिक्षक सोो श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हेप्रकटीकरण विभागातील अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन केलेले आहे.

Post a Comment

0 Comments