सहकार क्षेत्रामधील योग्य शिक्षण, प्रशिक्षण व कौशले प्राप्त करून विविध व्यवसायसह अनेक नोकरीच्या संधीसाठी युवकांनी स्वतःला सिद्धकरावे-
सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप.
कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे सहकार संवर्धन आणि सहकारी चळवळीत युवकांचा सहभाग या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहकार निबंधक कार्यालय,मेढा येथील सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सहकार हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे. दुर्बल घटकांचा आधार म्हणून सहकाराकडे पाहिले जाते.देशाच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनात सहकारी संस्थांनी महत्वाचे योगदान दिले आहे. जागतिकीकरणानंतर सहकारी संस्थांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. असे असले तरीही ग्रामीण समाजातील अर्थिक दृष्टया दुर्बल घटकांचे हित जोपासण्याचे कार्य सहकारी संस्था पार पाडत आहेत. देशाचा सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी सहकाराशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणुनच युवकांनी सहकारी चळवळीच्या विकासासाठी आणि सहकाराचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेऊन समाजात सहकार विषयक जागृती निर्माण करावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी यांनी या चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका सांगून विद्यार्थ्यानी सहकाराचे प्रशिक्षण घेऊन आपले नेतृत्व विकसित करावे आणि सामजिक परिवर्तनाबरोबरच सहकारी संस्थामधून उपलब्ध होत असलेल्या अनेक रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले. या चर्चासत्रासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, सहकार तज्ञ श्री. वैभव शिंदे, श्री. अक्षय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्राचे संयोजन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत करण्यात आले.प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय धोंडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुजित कसबे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.डॉ. मृणालिनी वाईकर यांनी केले.महाविद्यालयातील शिक्षक आणि १२० विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विषेश परिश्रम घेतले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!