वाई ! ९९ ग्रामपंचायतीची सरपंच पदाची सोडत जाहीर
अक्षय क्षीरसागर / वाई प्रतिनिधी
वाई, दि.४ : वाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत शासनाच्या आदेशाने शुक्रवार दिनांक ४ रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहात तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली तर नाईब तहसीलदार वैभव पवार, भाऊसाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडली. चिठ्ठ्या काढून काही गावातील आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षणामुळे अनेकांची स्वप्ने भंगली असून ज्या ठिकाणी मागील वेळेस ओबीसी आरक्षण पडले होते त्या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने कही ख़ुशी कही गम अशी अवस्था झालेली आहे. प्रमुख गावांमध्ये जागा आरक्षित झाल्यामुळे पुढाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. तर गावपुढाऱ्यांच स्वप्न धुळीस मिळाले आहे. ओबीसी सरपंच पदाची एक जागा वाढली आहे तर सर्वसाधारण एक जागा कमी झाली आहे.
आजच्या आरक्षण सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीवसाठी पसरणी, केंजळ, अनवडी, मोहोडेकरवाडी, मांढरदेव, धोम, खोलवडी, कोंढवळे, गुंडेवाडी (पिराचीवाडी), वडोली, दसवडी, परतवाडी, गाढवेवाडी, दरेवाडी, ओबीसी खुल्या गटासाठी बावधन, सुरूर, खावली, उडतारे, व्याजवाडी, भिवडी पुन. वेलंग, कोंढवली, ओहोळी, अनपटवाडी, मुगांव (न्हाळेवाडी), कुसगांव, वेरुळी (डूईचीवाडी) आरक्षित झाले आहे. तसेच अनुसूचित जाती महिला कणूर, गुळून्ब, जांब, लगडवाडी (मापरवाडी, वाकनवाडी), वाशिवली, खुल्या गटामध्ये उळून्ब (बलकवडी), एकसर, चांदवडी (पुन.), जांभळी, परखंदी अनुसूचित जमाती महिला वहागांव, खुला गट विरमाडे या गावांसाठी आरक्षित झाले आहे. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या केंजळ, बावधन, पसरणी गावांत गाव पुढार्यांना धक्का बसला आहे. तर सर्वसाधारण महिला अमृतवाडी, भुईंज, शहाबाग, कडेगाव, राऊतवाडी, पाचवड, गोळेगाव, पांडेवाडी, किकली, बोपर्डी, बोरीव/व्याहळी, धावडी, देगाव, बोरगाव, वयगाव, किरोंडे, लोहारे, नांदगणे, निकमवाडी, आनंदपुर, भोगाव, सटालेवाडी, शेलारवाडी, मालतपूर, ओझर्डे, बोपेगांव, विठ्ठलवाडी, पांढरेचीवाडी, वासोळे, व्याहळी पुनर्वसन, तर सर्वसाधारण पुरुष सुलतानपूर, बेलमाची, खानापूर, चिंदवली, शिरगाव, धोम पुनर्वसन, मेनवली, वेळे, कवठे, काळंगवाडी, अभेपुरी, पाचपुतेवाडी (वडाचीवाडी), शेंदुरजणे, चिखली, चांदक, पांडे, दहयाट, वाघजाईवाडी, आकोशी, वरखडवाडी, आसरे (आंबेदरावाडी, पानस), नागेवाडी, मुंगसेवाडी, बालेघर, जोर, कळंबे, खडकी या गावांचा समावेश आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण २७ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १४ महिला व 13 सर्वसाधारण पुरुष तर अनुसूचित जाती महिला पाच व सर्वसाधारण पुरुष पाच अशा दहा जागा आरक्षित करण्यात आले आहेत.
सर्वसाधारणसाठी एकूण ६० जागासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून त्यापैकी ३० महिला तर सर्वसाधारण पुरुषांसाठी 30 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमाती महिलांसाठी एक व सर्वसाधारण पुरुष साठी एक जागा आरक्षित करण्यात आलेली आहे.
यावेळी २० आरक्षित चिठ्ठ्या काढण्यात आल्या. तर यावेळी यांच्यासह वाई तालुक्यातील अनेक गावातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून ९९ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. अनुसूचित जातीसाठी १० जागा, जमातीसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी २७ जागा, तसेच सर्वसाधारण गटासाठी ६० जागा सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आली. यावेळी अनेकांनी फक्त आरक्षण जाहीर करू नका तर लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!