कुडाळ व परिसरातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे व्हावे-वीरेंद्र शिंदे
कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी
श्री.वीरेंद्र सुरेशराव शिंदे मा. सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुडाळ ग्रामपंचायत यांनी अतिवृष्टीने कुडाळ गावातील व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान बाबत कुडाळ मंडल अधिकारी सौ रेखा कोळी यांच्याकडे योग्य त्या उपाययोजना तात्काळ करावी अशी विनंती केली.
महोदय वरील विषयास अनुसरून आम्ही आपणास कळवू इच्छितो 10 मे. पासून सुरू असलेला पाऊस आज दिनांक 3 जुलै २०२५ पर्यंत जावळी तालुक्यासह कुडाळ गावात मोठ्या प्रमाणात पडला असून यामुळे कुडाळ गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे फार मोठे नुकसान झाले आहे शेतामध्ये नदीचे पाणी गेल्यामुळे शेतजमीन नापीक झाले आहे अशा मध्ये शेतकरी मेटाकोटीला आला आहे.अजून तालुक्यासह कुडाळ मध्ये एक हेक्टर हि पेरणी झालेली नाही हे बाब गंभीर असून आपल्या स्तरावर झालेल्या नुकसानाचे पंचनामे व्हावे व शासन दरबारी आमची मागणी मांडण्यात यावी व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तात्काळ करावी अशी विनंती कुडाळ मंडल अधिकारी सौ रेखा कोळी यांच्याकडे वीरेंद्र शिंदे यांचे सह अनेक शेतकऱ्यांनी केली.
यावेळी रेखा कोळी यांनी शेतकऱ्यांना गट नंबर सह यादीची मागणी केली आहे.या संदर्भात शासन स्तरावर रिपोर्टिंग केले जाईल असे मंडल अधिकारी यांनी सांगितले
यावेळी लक्ष्मण पवार,आशिष रासकर,प्रवीण मोरे,संदीप पवार,शशी कचरे,नितीन मोरे इत्यादी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!