भोरला लोकअदालत; ५२ प्रकरणे निकाली
मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुरु असलेले दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी भोर येथील अभिजित मंगल कार्यालयात सोमवारी (ता. ९) आयोजित केलेल्या महसूल लोक अदालतीत ५२ प्रकरणे निकालीत काढण्यात आली.
भोरमध्ये आयोजित केलेल्या या महसुल लोक अदालतीत तडजोड झालेली २२ प्रकरणे, काढून टाकलेली ११ आणि निर्णयावर बंद असलेली १९ प्रकरणे अशी एकूण ५२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार अरुण कदम, प्रतिभा खाडे, मंदार नेरेकर, प्रवीण माने, मंडलअधिकारी शेखर जगताप, एम. ए. शेख, रूपाली गायकवाड आदी उपस्थित होते. महसूल अदालतीच्या सर्व पक्षकार विधिज्ञ यांची सद्यस्थितीमध्ये प्रलंबित असणारी अर्धन्यायिक स्वरूपाची सुनावणी वरील प्रकरणे महसूल लोक अदालतीमध्ये घेऊन उभय पक्षकार यांचे तडजोडीने निकाली काढण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी सांगितले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!