महिलेस मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल


 महिलेस मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल


 खंडाळा प्रतिनिधी


कुटुंबास मारहाण प्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. 22 रोजी रात्रौ 8.30 वा चे सुमारास मौजे तोंडल ता खंडाळा गावचे हद्दीत सुदाम जाधव यांचे भाड्याचे घरात राहत असताना फिर्यादी यांचा चुलत भाऊ समीर धनाजी तारु व त्यांची पत्नी वृषाली समीर तारु दोन्ही रा. तोंडल हे अनाधिकाराने घरात घुसुन समीर तारु हा फिर्यादी व त्यांच्या वडीलांना म्हणाला की, तुम्ही घराची दुरुस्ती करायची नाही ही घर माझे आहे असे म्हणुन चिडुन जावुन फिर्यादी यास शिवीगाळ, दमदाटी, हाताने मारहाण करुन फिर्यादीच्या  मनास लज्जा उत्पन्न होईल कृत्य केले. तसेच फिर्यादीच्या बहिण व वडील यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणुन फिर्यादी यांची त्यांचे विरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास शिरवळ पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments