ग वि भोसले प्रतिष्ठान यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात


 *ग वि भोसले प्रतिष्ठान यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात*


प्रतिनिधी.धिरज जगताप 


फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील दहावी  व बारावी  विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला साखरवाडी गावातील श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठान व जायंटस वेल्फेअर फाउंडेशन यांचे अध्यक्ष सचिन गणपत भोसले व उपाध्यक्ष संजय गणपत भोसले व सचिव हरिदास दिगंबर सावंत सर यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला साखरवाडी गावातील यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन गणपत भोसले व उपाध्यक्ष संजय गणपत भोसले  व सचिव हरिदास दिगंबर सावंत सर व महानंदा दूध डेरी चे संचालक डिके पवार व डॉक्टर खानविलकर सर व यासारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली 


   मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन गणपत भोसले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आजच्या विद्यार्थ्यांचे यश हे केवळ त्यांचे नाही तर त्यांच्या कुटुंबाचे आणि गावाचेही आहे.या विद्यार्थ्यांनी भविष्यातही याच जिद्दीने वाटचाल करावी आणि गावाचे नाव रोशन करावे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व या कार्यक्रमात उपस्थित श्री.ग.वि भोसले प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन गणपत भोसले व उपाध्यक्ष संजय गणपत भोसले व सचिव हरिदास दिगंबर सावंत सर व महानंदा दूध डेरी चे संचालक डिके पवार व डॉक्टर खानविलकर व गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments