भोर शहरातील अमरधाम स्मशानभूमीत शेवाळ्याचे साम्राज्य — नागरिकांचे जीव धोक्यात


 धनाजी पवार/ निवासी संपादक/पुणे प्रतिनिधि.


भोर शहरातील अमरधाम स्मशानभूमीत शेवाळ्याचे साम्राज्य — नागरिकांचे जीव धोक्यात


भोर शहरातील अमरधाम स्मशानभूमीत जागोजागी शेवाळ्याचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेवाळ्यामुळे पाय घसरून पडण्याच्या अनेक घटना घडल्या असून काहीजण जखमी देखील झाले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर भोरकर प्रतिष्ठानचे सचिव विनय पलंगे यांनी स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले असून, "अमरधाम स्मशानभूमी ही नागरिकांच्या अंतिम यात्रेची शांत आणि सुरक्षित जागा असावी. मात्र, सध्या तेथे अस्वच्छता व शेवाळ्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने त्वरित याची दखल घ्यावी आणि वेळोवेळी स्वच्छता व देखभाल करून नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवावेत,अशी मागणी त्यांनी केली. शहरातील अनेक नागरिकांनीही यासंबंधी नाराजी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments