रासायनिक खत आणि युरियामुळे मानवी आरोग्य व शेतीला धोका,कृषी खात्यामार्फत जागृती मोहीम.


 रासायनिक खत आणि युरियामुळे मानवी आरोग्य व शेतीला धोका,कृषी खात्यामार्फत जागृती मोहीम.


कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी 


रासायनिक खत आणि युरियामुळे मानवी आरोग्य व शेतीला धोका होत असल्यामुळे कृषी खात्यामार्फत जागृती मोहीम.


सध्या शेतकरी अधिक उत्पादनासाठी युरियाचा वापर अधिक प्रमाणात करत आहेत मात्र या वापरामुळे जमिनीचा पोत घसरतो तसेच मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे त्यामुळे युरिया ऐवजी किंवा रासायनिक खत ऐवजी आपल्या शेतीमध्ये देशी गाईंचे पालन करून सेंद्रिय गांडूळ खत.वापर करावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने.जावळी तालुक्यातील हुमगाव या ठिकाणी  जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

 

यावेळी शेतकरी नेते श्री कमलाकर नाना भोसले यांच्या शेतीमध्ये सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीने केलेल्या आठ फूट सरी वरील पट्टा पद्धत  ऊस लागवडीचा यशस्वी प्रयोग जावली तालुका मंडल कृषी अधिकारी श्री घोरपडे साहेब व त्यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी वर्ग व कृषी सहाय्यक यांनी नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय  उसशेतामध्ये केलेला यशस्वी प्रयोगाबद्दल श्री भोसले यांचे कृषी विभागामार्फत कौतुक केले यावेळी आपल्या शेताच्या बांधावर आलेल्या कृषी अधिकाऱ्यांचा श्री भोसले यांनी सन्मान केला.


तालुका कृषी मंडळ अधिकारी श्री घोरपडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना.श्री भोसले यांनी आपल्या शेतामध्ये आठ फूट सरी पट्टा पद्धत केल्यामुळे शेतीची सुपीकता वाढवली असून संपूर्ण शेतामध्ये  शेणखत आणि गोमूत्र वापरल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढलेला असल्यामुळे या उसापासून शंभर टक्के सेंद्रिय गूळ तयार होईल त्याचबरोबर ऊस लागवडीसाठी 15.0.12.ऊसबेने लागवडी योग्य तयार असल्याचे सांगितले.  जमिनीमध्ये गांडूळ निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे याचे. प्रात्यक्षिक उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना घोरपडे साहेब यांनी  दाखवले शेतामध्ये कुजलेले गवतच गांडुळांचे खाद्य बनले असल्यामुळे श्री कमलाकर भोसले नाना यांचा ऊस शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.सर्वच शेतकऱ्यांनी देशी गाईंचे पालन करून प्रत्येक शेतकऱ्यांनी श्री भोसले यांच्या प्रमाणेच आपल्या शेतामध्ये असा प्रयोग करून आपले नैसर्गिक सेंद्रिय उत्पादन वाढवावे असे आवाहन करण्यात आले.यावेळी कृषी विभाग जावली तालुका मंडळ कृषी अधिकारी श्री घोरपडे साहेब. शेतकरी नेते.श्री कमलाकर भोसले नाना.उपसरपंच श्री प्रवीण शिंदे.श्री.प्रमोद शिंदे.श्री रत्नकांत शिंदे श्री सतीश जाधव  श्री लहूकुमार भोसले.श्री प्रशांत भोसले.श्री. नितीन शिंदे  धैर्यशील शिंदे.विलास शिंदे सचिन चव्हाण कृषी सहाय्यक नेहा मॅडम व कृषी विभाग अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments