खामगाव कमानीतून खामगाव कडे जाणाऱ्या रस्त्याचे खड्डे बुजणार कधी ग्रामस्थांचा प्रशासन व लोकप्रतिनिधीना संतप्त सवाल


 *खामगाव कमानीतून खामगाव कडे जाणाऱ्या रस्त्याचे खड्डे बुजणार कधी*

*ग्रामस्थांचा प्रशासन व लोकप्रतिनिधीना संतप्त सवाल*


 प्रतिनिधी/धिरज जगताप 


      खामगाव ता.फलटण मधील खामगाव कमानीतून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे गावचे स्वागतच खड्ड्यातून होत असलेने नागरिक संतप्त झाले आहेत 

         सर्व प्रकारच्या निवडणूकी मध्ये विकासाच्या नावाने मतांचा जोगवा मागणारे नेते गेले कुठे? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असून या रस्त्यांच्या खड्ड्यां पायी सर्वजण हैराण झाले आहेत खामगाव गावच्या प्रशासनामधील ग्रामसेवक,सरपंच,सदस्य रोज याच रस्त्याने ये जा करतात तरीही हे खड्डे बुडवण्याची संबधित विभागाकडे गेल्या काही वर्षांपासून साधी मागणीही केली गेली नाही 

             दररोज खामगाव गावामधून साखरवाडीकडे शाळकरी मुले,ज्येष्ठ नागरिक,व ग्रामस्थ येत असतात गेल्या काही दिवसांपूर्वीच या खड्ड्यांमुळे शाळकरी मुलाचा अपघात होता होता बचावला आहे 

            संबंधित प्रशासनाने खामगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

Post a Comment

0 Comments