पाचगणी पोलीस स्टेशन यांची दमदार कामगिरी पाचगणी पोलीस ठाणे प्रकटीकरण शाखेस यक्ष


 पाचगणी पोलीस स्टेशन यांची दमदार कामगिरी पाचगणी पोलीस ठाणे प्रकटीकरण शाखेस यक्ष


प्रतीनिधी  नौशाद सय्यद

पांचगणी


कारवाई करण्याकरीता प्रयत्नशील(गहाळ झालेल्या मोबाईचा शोध घेवुन एकुण ४,४०,०००/- रुपये किमतीचे मोबाईल नागरीकांना परत करण्यास पांचगणी पोलीस ठाणे, सायबर व गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.)


1) गहाळ मोबाईल शोध 22


पांचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रहीवासी व पर्यटकांचे मोबाईल गहाळ ब-याच प्रमाणात गहाळ झाले होते. सदर मोबाईलचा शोध होणेकामी मा. वरीष्ठांचे आदेशाने विशेष मोहिम राबवुन त्याकरीता विशेष प्रयत्न करुन गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. मा वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस अंमलदार यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात गहाळ मोबाईलचा तपास हाती घेतला होता.


पांचगणी पोलीस ठाणे दाखल गहाळ मधील मोबाईल फोनचे बुद्धी कौशल्याने व तांत्रिक माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील परीसर व आजुबाजुचे पोलीस ठाणे हद्दीतील गावातुन तसेच इतर जिल्यातुन शोध घेवुन एकुण ४,४०,०००/- रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण २२ मोबाईल फोनचा शोध घेवुन ते प्राप्त करण्यास गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले असुन नमुद मोबाईल फोन नागरीकांना परत करणेत आलेले आहेत.


आत्तापर्यंत मागील 1 वर्षात 70 मोबाईल चा शोध घेवुन ते नागरीकांना परत करणेत आलेले आहेत.


2) उघडयावर दारु पिणा-या इसमांविरुध्द कारवाई - 18


पांचगणी पोलीस ठाणे हद्दीत उघडयावर दारु पिणा-या इसमांविरुध्द प्रचलीत कायदयान्वये चालु वर्षात 2025 मध्ये एकुण 18 केसेस करुन कायदेशिर कारवाई केलेली आहे. दारु पिवुन वाहण चालवणा-यांविरुध्द 11 केसेस केलेल्या आहेत. तसेच एनडीपीएस कायदया अंतर्गत 10 कारवाई करणेत आलेल्या आहेत. यापुढेही उघडयावर सार्वजनिक ठिकाणी दारु पिणारे इसमांच्यावर कडक कारवाई करण्याकरीता प्रयत्नशील आहोत.


3) ऑनलाईन फ्रॉड द्वारे गेलेली रक्कम परत -


अलीकडे सायबर गुन्हयाचे प्रमाण वाढले असुन अज्ञात इसमादवारे मोबाईलवरुन लोकांची फसवणुक केली जात आहे. त्यामध्ये लोकांची अर्थिक फसवणुक होत आहे. अशाच प्रकारे पाचगणी पोलीस ठाणे हददीतील सायबर गुन्हयास बळी पडलेल्या नागरीकांची फसवणुक रक्कम परत मिळवुन देण्याकरीता विशेष प्रयत्न करुन एकुण 3,70,000/- रुपये संबंधीत नागरीकांना परत मिळवुन दिलेली आहे. आहोत.


4) पांचगणी पोलीस स्टेशन वाहतुक नियंत्रन शाखेमार्फत केलेली कारवाई - 29


गतीमाण पांचगणी मोहीमे अंतर्गत पांचगणी हे नामांकीत पर्यटन स्थळ असुन येथे वर्षभर मोठया प्रमाणावर विविध राज्यातुन तसेच देशातुन पर्यटक येत असतात त्यांचे वाहतुक कोंडी होवु नये म्हणुन जुने पोलीस स्टेशन इमारतीचे नुतनिकरण करुन त्या ठीकाणी वाहतुक शाखा नव्याने तयार करुन त्या मार्फत पांचगणी पोलीस ठाणे हद्दितील मुख्य चौक येथिल रहदारी नियमन वाहतुक पोलीसांमार्फत तसेच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे महाराष्ट्र सुरक्षा पथकादवारे शहरातील मख्य पर्यटन स्थळे यांठीकाणी वाहतुक नियमन व पर्यटकांसाठी सुरक्षा प्रदान करणेत आली. तसेच वाहतुकीचे नियम मोडणारे यांचेवर प्रचलीत कयदयान्वये 29 केसेस केलेल्या आहेत. तसेच इतरच्या दंडात्मक 1030 केसेस 8,80,350/- दंड करणेत आलेल्या आहेत.


5) आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांचे निवडणुक मपोअधिकाक 56 प्रमाणे 2 प्रस्ताव


आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परीषद, नगरपरीषद, नगरपालीका निवडणुकीसाठी पांचगणी पोलीस सुसज्ज झाले असुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे प्रस्ताव पाठवणेत आलेला आहे. तसेच सीआरपीसी 107,108,109,110 प्रमाणे एकुण 74 प्रतिबंधक कारवाई करणेत आलेल्या आहेत.


6) पांचगणी पोलीस ठाणे मा. मुख्यमंत्री 100 दिवस आराखडा सहभाग-


पांचगणी पोलीस ठाणेत 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विषेश मोहीमे अंतर्गत पांचगणी पोलीस स्टेशन ने सहभाग घेतलेला होता. पोलीस अंमलदार यांचे करीता सुसज्ज असे स्वतंत्र बैठक व्यवस्था, पोलीस स्टेशनमध्ये सुव्यवस्थित नामफलक लावणेत आलेले आहेत, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, आपले सरकार पोर्टल वरील तक्रारींचे तात्काळ निराकरण, अभ्यागत भेटीचे नियोजन व भेटीचे वेळेबाबत प्रसिध्दी, निर्भया पथक नेमुण त्यांचे द्वारे शाळांना भेटी, तसेच बदलापुर येथे घडलेल्या अनुचीत प्रकार पांचगणी येथे घड्डु नये म्हणून सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षेकतर स्टाफ यांची विषेश चारीत्र्य पडताळणी मोहीम राबवली.


सदर कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी साो सातारा, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर साो सातारा व उपविभागिय पोलीस अधिकारी श्री बाळासाहेब भालचीम साो वाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिलीप पवार व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अधिकारी श्री. बालाजी सोनुने व पोलीस अंमलदार पोलीस हवालदार/1283 श्रीकांत यदु कांबळे, महीला पोलीस हवालदार/2182 रेखा आप्पासो तांबे पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल ७६२ उमेश रामचंद्र लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल ७०० अमोल धर्म जगताप यांनी सहभाग घेतला आहे.


(दिलीप पवार) सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचगणी पोलीस ठाणे

Post a Comment

0 Comments