समाजभूषण अशोक (दादा) जाधव यांच्या जयंती उत्साहात साजरी!
मांढरदेव गावचे सुपुत्र, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते , सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी शाखाप्रमुख व समाजभूषण पुरस्काराने सन्मानित स्व.अशोक (दादा) तुकाराम जाधव यांचा ५ जून रोजी जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने मांढरदेव ग्रामस्थ, महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडी,व इतर संघटनांनी एकत्रितपणे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते.सकाळी मांढरदेव येथील निवासस्थानी प्रतिमा पुजन करण्यात आले.त्यानंतर यशोधन वृद्धाश्रम (वेळे) येथे वृक्षारोपण, निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले.त्यानंतर अनेक मान्यवरांनी अशोक दादा यांच्या कार्याचा उल्लेख करत भाषणं केली.दिलीप कांबळे यांनी सुत्रसंचलन केले.दत्ता डाडर,शिवाजी भिसे,सुनिता जाधव, चंद्रकांत मांढरे यांनी दादांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.तसेच यशोधन संस्थेचे प्रमुख रवी बोडके यांनी समकालीन सामाजिक स्थितीवर भाषण केले. त्यानंतर आश्रमातील सर्व लोकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम केला.तसेच सायंकाळी मांढरदेव येथील निवासस्थानी भुईंज येथील भजनी मंडळाचा सुश्राव्य भजन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला सर्व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व मांढरदेव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित महंमद शेख,दत्ता डाडर, शिवाजी भिसे, सुनिता जाधव, चंद्रकांत मांढरे,बाबाजी मांढरे, बाळासाहेब लगस,प्रवीण क्षीरसागर, दिलीप कांबळे, प्रवीण सपकाळ,ऋषिकेश वायदंडे,सनी ननावरे, सोमनाथ वायदंडे, विजय वैराट व इतर सर्व जाधव कुटुंबीय उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!