पांचगणी दांडेघर बसस्टॉप जवळ भरधाव वेगात असणार्‍या गाडीच्या धडकेत गाढवाचा जागीच मृत्यू


 पांचगणी दांडेघर बसस्टॉप जवळ भरधाव वेगात असणार्‍या गाडीच्या धडकेत गाढवाचा जागीच मृत्यू


महाबळेश्वर प्रतिनिधी


पाचगणी वाई घाटामध्ये दांडेघर गावाच्या बसस्टॉप जवळ सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान एका भरधाव गाडीच्या धडकेत एका निष्पाप गाढवाचा जाग्यावरच मृत्यू झाला. प्रथमतः घाटातून खाली जात असताना गाडीवाल्यांनी ही वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या एका चुकीमुळे खूपदा निष्पाप जीवांवर काळाची झडप बसते.

       ही घटना सकाळी झाली आहे आणि पूर्ण दिवसभर स्थानिक प्रशासन असेल किंवा ग्रामपंचायत असेल यांनी सदर घटनेची  अजिबात दखल घेतली गेली नाही त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना हा गोष्टीचा नाहक त्रास होत आहे.

      एका बाजूला स्वतःला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेने मिरवायचे आणि दुसरीकडे पर्यटकांना होणाऱ्या गैरसोयीकडे कानाडोळा करायचा. पाचगणी हद्दीत प्रवेश करताना सक्तीने जसा टोल वसूल करता त्याप्रमाणेच इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास होणार नाही ह्याची काळजी नगरपरिषदेने घेतली पाहिजे.

   पाचगणी आणि आजुबाजूचा परिसरामध्ये, रस्त्यालगत जे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ह्याला जबाबदार कोण??

नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनाकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे कारण दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. स्थानिक हॉटेल्स आणि व्यावसायिक बंगलो वाले यांच्याकडून सर्रास हा कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जातोय अशा व्यक्तींवर कारवाई करून त्यांना  कायद्याचा बडगा दाखवणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments