महाबळेश्वर वेण्णा माईची खणा नारळाने नगरपालिकेने ओटी भरली... 

महाबळेश्वर =

 महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरची जलवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे 

   महाबळेश्वरची भाग्य लक्ष्मी असलेल्या वेण्णा माईचे जलपुजनाचा कार्यक्रम नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष किसनसेठ शिंदे, माजी नगरसेविका विमलताई ओंबळे, शारदा ढाणक,सुरेखा आखाडे,माजी नगरसेवक सुनील शिंदे अर्बन बँक संचालक शरद बावळेकर, रेवणे अण्णा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य लिपिक आबा ढोबळे, विठ्ठल जाधव, अरुण बावळेकर, ताजू शारवान, अरुण बावळेकर, लालु पन्हाळकर, बोटमन उमेश रोकडे,जमीर शारवान बासिद डांगे, पत्रकार राहुल शेलार, रियाज मुजावर  उपस्थित होते.

    वेण्णा तलावावर नगरपालिका बोट क्लब चालविते तसेच येथील जलसाठा महाबळेश्वर, पांचगणी शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणला जातो. दरवर्षी पावसाने वेण्णा लेक  भरल्या नंतर वेण्णा नदीची खणा नारळाने ओटी भरण्याची परंपरा आहे. वेण्णा लेक भरल्यामुळे रविवारी परंपरे नुसार नगरपालिकेच्या वतीने वेण्णा तलाव जल पूजन करून वेण्णा माईची ओटी भरण्यात आली. 


 *रियाज मुजावर महाबळेश्वर* ( *माहिती)*

Post a Comment

0 Comments