--- सुरक्षा भिंतीमुळे कचरा कुंडी सुरूप जाण्यास अडथळा




सुरक्षा भिंतीमुळे कचरा कुंडी सुरूप जाण्यास अडथळा


प्रतिनिधी – पाचगणी


पाचगणी येथील अर्थर रोड परिसरात नगरपालिकेने कचरा असून, सकाळी व संध्याकाळी दोन वेळा कचरा संकलनासाठी गाडी येते. मात्र, समोर उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत नागरिकांना मोठा अडथळा ठरत आहे.


सदर ठिकाणी टू-व्हीलरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक असून, वयस्कर नागरिक, महिला व लहान मुलांना कचरा मूळे त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिक अजूनही संध्याकाळच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी येतात. मात्र, भिंतीमुळे सरळ प्रवेश करता येत नाही. यामुळे त्या ठिकाणी कचरा चा उपयोग अडथळ्यांतूनच करावा लागत आहे.


याशिवाय, रात्रीच्या वेळी कुत्र्यांमुळे कचरा रस्त्यावर पसरवला जातो. सकाळी नगरपालिकेचे कर्मचारी तो गोळा करत असले, तरी स्वच्छतेच्या दृष्टीने ही समस्या गंभीर आहे. सुरक्षा भिंतीमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती लक्षात घेता, सदर भिंत तातडीने काढण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments